Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee co-operative patsantha update ] : राज्यातील नागरी / ग्रामीण बिगरशेती / कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांच्या वैयक्तिक भाग धारण मर्यादेबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , पुणे यांच्या मार्फत अंत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 28 मध्ये पतसंस्थांच्या सभासदांना वैयक्तिक भाग धारण करण्याचे मर्यादेबाबत , पुढीलप्रमाणे तरतुद करण्यात आलेली आहे . कलम 28 भाग धारण करण्यावर निर्बंध – यांमध्ये कोणत्याही संस्थेत ( यांमध्ये सहकारी अथवा कोणतीही इतर संस्था / राज्य शासनांच्या पुर्वमंजुरीने महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 नुसार रचना करण्यात आलेल्या जिल्हा परिषद या व्यतिरिक्त कोणत्याही सदस्यास )
तसेच यांमध्ये संस्थेच्या एकुण भाग भांडवलाच्या विहीत करण्यात येईल , अशा हिश्यापेक्षा अधिक हिस्सा धारण करता येणार नाही अथवा संस्थेच्या भागांमध्ये 20,000/- रुपयांहून असा कोणताही हितसंबंध धारण करता येणार नाही अथवा त्याबाबत दावा करता येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
तर सदर कलमांच्या परंतुकान्वये राज्य शासनांच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2010 रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यांमधील नागरी / ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व पगारदार सहकारी पतसंस्थांचे सभासदांचे वैयक्तिक भाग धारण मर्यादा रुपये 2 लाख इतकी अधिसूचित करण्यात आलेली होती .
तर राज्य शासनांच्या दिनांक 24 एप्रिल 2024 च्या अधिसूचनेनुसार राज्यातील नागरी / ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व पगारदार सहकारी पतसंस्थांचे सभासदांची वैयक्तिक भाग धारण मर्यादा रुपये 2 लाख वरुन 5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे .
या संदर्भात राज्य शासनांच्या अपर निबंधक सहकारी संस्था म.राज्य पुणे यांच्या मार्फत दिनांक 20 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.