Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Cashless Facility ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुन 2024 पासुन कॅशलेस आरोग्य योजना लागु करण्याबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 11 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे जुन 2024 पासुन कॅशलेस आरोग्य योजना लागु करण्याबाबत राज्यातील सर्व आयुक्त ( शिक्षण ) पुणे , संचालक ( प्राथमिक ) पुणे , संचालक ( माध्य.व उच्च माध्यमिक ) पुणे , यांच्या प्रति सदरचे प्रतिपत्रक कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून सादर करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त 100 टक्के अनुदानित व अंशत : अनुदानित / प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक / तांत्रिक / अध्यापक शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची विभाग निहाय , जिल्हा- निहाय व वर्गवारीनिहाय संख्या व ..
शिक्षके – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपुर्तीकरीता होणाऱ्या खर्चाची मागील 05 वर्षांची वर्षनिहाय माहिती स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह तात्काळ सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे .
या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 11 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.