आता कर्मचाऱ्यांची हजेरी GPS व बायोमॅट्री प्रणालीच्या माध्यमातुन ; परिपत्रक निर्गमित !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee attendance is monitored through GPS and biometric systems ] : कर्मचाऱ्यांची हजेरी ही जीपीएस व बायोमॅट्रीय प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभाग मार्फत दि.10.12.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे .

सदर प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली / फेस रिडिंग प्रणाली या सारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातुन कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते . ग्रामसेवकांच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागाच्या जवळ आहेत अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रीक हजेरी राबविण्यात येते .

अतिदुर्गम , डोंगराळ भागात नेटवर्क कनेक्शन नसल्यामुळे बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येवू शकतात , तथापि सध्य स्थितीत बहुतांश भागांमध्ये Network Connectivity उपलब्ध आहे .

त्यामुळे ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागालगत आहेत , किंवा ज्या-ज्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध आहे , अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रीय / जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश उप सचिव ग्राम विकास विभाग मार्फत सर्व विभागीय आयुक्त तसेच सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment