लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : लेखाशिर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल ते माहे जून 2023 या तिमाहीसाठी 20 टक्के तरतुद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.16 मे 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयन्वये समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षक शिक्षण ही केंद्र पुरस्कृत योजना आहे , सदर योजना अंतर्गत राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी राज्य हिस्सा लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली सन 2023-24 करीता अर्थसंकल्पीत रकमेपैकी एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी 20 टक्के 9,33,89,600/- इतकी तरतुद वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
वित्त विभागाने दि.06 मे 2022 च्या पत्रान्वये केलेल्या मार्गदर्शनानुसार सदर अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनावरील खर्च सुरुवातीला राज्य हिश्याच्या लेखाशिर्षांतर्गत 01 वेतन उद्दिष्टांतर्गत तरतुद मधून करण्यात येत आहे . तसेच अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनाखाली होणाऱ्या कपातीच्या नोंदी जसे GPF , GIS , Income Tax इ. राज्यातील सेवार्थ प्रणाली मध्ये ठेवण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !
तसेच सदर 01 वेतन या उद्दिष्टाखलील तरतुद नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून , सदर खर्च वित्त विभागाच्या दिनांक 12..04.2023 च्या शासन परिपत्रकातील तसेच आनुषंगिक परिपत्रकांच्या सूचनांनुसार करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत .या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक .16.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावे .
शासकीय कर्मचारी विषयक , सरकारी नोकरी विषयक , शासकीय योजना तसेच इतर माहितीसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !