Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Elon Musk satellite based internet facility ] : भारतामध्ये आता ईलॉन मस्कने जिओ , एअरटेल पेक्षा फास्ट सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सुविधा लॉंच करण्याच्या तयारीत आहे , याकरिता काही आवश्यक डॉक्युमेंटरी भारत सरकार मार्फत करण्यात येत . ही सुविधा सॅटेलाईट बेस्ड असल्याने , इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक असणार आहे .

ईलॉन मस्कच्या स्टारलिंक या सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सुविधा भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत असून , सदर स्टारलिंक व भारताच्या दूरसंचार विभागाची सविस्तर चर्चा झाली असून  ,स्टारलिंकने भारताच्या दुरसंचार विभागाच्या अटी व शर्ती मान्य केले आहेत . त्यामुळे स्टारलिंक मार्फत भारतात इंटरनेट सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

सदर बैठकीच्या चर्चेनंतर स्टारलिंग मार्फत भारतात इंटरनेट सुविधा सुरू करण्याकरिता , अर्ज सादर केला आहे . सदर कंपनीकडून इंटरनेट सुविधाही सॅटेलाइट बेस्ड उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यामुळे इतर नेटवर्क कंपनी पेक्षा अधिक वेगाने व कमी खर्चात नेट सुविधा उपलब्ध होईल .

भारतीय दूरसंचार विभागाने सदर प्रस्ताव मान्य केल्याने , भारतातील इतर खाजगी नेटवर्क कंपन्यांची चिंता वाढवली आहे . कारण स्टारलिंगच्या तुलनेत इतर कोणतेही नेटवर्क फास्ट व स्वस्त सुविधा देऊ शकणार नाही . सध्या भारतामध्ये जिओ हे एक मात्र नेटवर्क कंपनी आहे जी की , भारतात सर्वत्र ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे .

मात्र स्टारलींगच्या प्रवेशाने  इतर खाजगी कंपन्यांचे , मार्केट दुपटीने कमी होणार हे निश्चित आहे . प्राप्त माहितीनुसार नवीन वर्षामध्ये सदर सुविधा भारतात सुरू होण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *