Spread the love

Live Marathipepar संगिता पवार [ Election Period Employee Rules ] : सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी मोठ्या प्रमाणात भव्य रॅलीचे आयोजन विविध पक्षांकडून करण्यात येत आहेत . यांमध्ये राज्यातील कर्मचारी सहभाग होतात , यामुळे समाजांमध्ये कर्मचाऱ्यांच्या समावेशाने वेगळा संदेश जात असतो , यामुळे निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत कि , जर प्रचार सभांमध्ये जर कोणताही कर्मचारी सहभागी झाल्यास त्यास नोकरी गमवावी लागणार आहे .

सरकारी कर्मचारी हा शासनांच्या वतीने काम करत असतो , त्याबद्दल्याता त्यांना वेतन स्वरुपात मोबदला दिला जातो , ज्या दिवशी पासून कर्मचारी शासन सेवेत रुजु होतो , त्या दिवसापासून त्यास काही गोष्टी टाळणे आवश्यक असते . त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही निवडणूक प्रचार सभांमध्ये तसेच रॅलीमध्ये प्रचार करणे , भाषणे देणे अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करता येत नाहीत . शिवाय त्यास नोकरीमध्ये असताना निवडणूक लढवता येत नाही .

परंतु खाजगी शाळा / संस्था मधील शिक्षक / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली होती , यांमध्ये खाजगी शाळेतील शिक्षक / कर्मचारी आपल्या संस्थाचालकांच्या परवानगीने निवडणूक लढवू शकतात .आता निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , खाजगी संस्था मधील शिक्षक / कर्मचारी प्रचार सभेत , रॅलीत दिसल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहे .

प्रचार ,रॅलीचे प्रशासनांकडून व्हिडीओ चित्रिकरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , त्यामुळे खाजगी संस्था मधील शिक्षक / कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रचार / रॅलीमध्ये सहभाग घेवू नयेत .

खाजगी संस्थामधील संस्थाचालकांकडून शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुंपले जातात , थेट प्रचार , भाषणे अशा कामाकरीता प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जातात . राज्यातील बऱ्याच संस्था ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या असल्याने , आता यापुढे शिक्षक / प्राध्यापक / कर्मचाऱ्यांना थेट प्रचार , भाषणे  अशा कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे , अशा प्रकारचे थेट परिपत्रक राज्य निवडणूक आयोगामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहेत .

जर कोणताही शिक्षक / कर्मचारी अशा प्रकारच्या निवडणूक / प्रचार रॅली तसेच भाषणे करताना आढळल्यास , त्यांस नोकरी गमवावी लागणार असल्याचे सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *