Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ election duty work paripatrak ] : विधानसभा निवडणुका 2024 कामकाजातून काही अधिकारी कर्मचाऱ्यांना वगळणे संदर्भात प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर यांच्यामार्फत माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी , अहिल्यानगर यांच्या प्रति महत्वपूर्ण परिपत्रक दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी सादर करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , शासकीय आश्रम शाळा वस्तीगृहे “या” आस्थापनेवर कार्यरत असणारे मुख्याध्यापक , गृहपाल , अधीक्षक , चौकीदार , स्वयंपाकी यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे कामकाजामधून वगळण्याची बाब नमूद करण्यात आली आहे .
सदर परिपत्रकानुसार , प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिनस्त आदिवासी मुला-मुलींचे 22 शासकीय वस्तीगृहे व 21 शासकीय आश्रम शाळा कार्यरत आहेत . सदर वस्तीगृहात तसेच शासकीय आश्रमशाळांमध्ये निवासी मुले व मुली शिक्षण घेत असतात .
सदर विद्यार्थ्यांचे देखरेख व नियंत्रण त्याचबरोबर भोजन व्यवस्था करणे करिता मुख्याध्यापक गृहपाल पुरुष / स्त्री आणि स्त्री अधीक्षक पुरुष , अधिक्षिका स्त्री , चौकीदार व स्वयंपाकी यांची आवश्यकता असल्याने , सदर कर्मचारी यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे कामकाजातून वगळण्यात यावे , अशी बाब नमूद करण्यात आली आहे .
याबाबतचा सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.