Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty What is Duty For Center Leader & other Election officer ] : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 करीता सध्या केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांची प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत .
मतदान प्रक्रिया मध्ये केंद्राध्यक्ष , पहिला मतदान अधिकारी , दुसरा मतदान अधिकारी , तिसरा मतदाना अधिकारी यांची एक टीम तयार करण्यात येते , यांमध्ये केंद्राध्यक्ष सर्वांचा प्रमुख असतो , त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम वर्क करण्यात येत असते . यांमध्ये पहिला , दुसरा व तिसरा मतदान अधिकारी यांचे कोणते काम असते ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पहिला मतदान अधिकारी : मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतिचा प्रभारी असतो , जो कि मतदाराची ओळख पटवून , दुसरा मतदान अधिकारी यांच्या पाठवित असतो .
दुसरा मतदान अधिकारी : दुसरा मतदान अधिकारी हा पक्क्या शाईचा प्रभारी असतो , तसेच तो नमुना 17 अ मधील मतदार नोंदवहीचा प्रभारी असतो , मतदाराची सही अथवा अंगठ्याचा ठसा घेईल ,तसेच प्रत्येक मतदाराला मतदार चिट्ठी देतो , तसेच मतदार नोंदवहीमध्ये मतदाराची ओळख पुरावा नमुद करण्याचे काम करता असतो .
तिसरा मतदान अधिकारी : तिसरा मतदान अधिकारी हा कंट्रोल युनिटचा प्रभारी असतो , जो कि मतदार चिट्ठी जमा करण्याचा काम करत असतो , तसेच कंट्रोल युनिटवरील उचित बटण दाबून मतदान युनिट सुरु करतो ..