Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election duty employee’s voting letter from election commission ] : आगामी विधानसभा निवडणुका 2024 निवडणुकीच्या कर्तव्यावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा अधिकार देणे संदर्भात , दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .

कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती यांच्या दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार , नमूद करण्यात आले आहे की , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती यांनी लोकसभा निवडणुका 2024 निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या बऱ्याच अधिकारी व कर्मचारी यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते .

त्यामुळे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मतदान करता येईल  अशी विनंती करण्यात आली आहे .

यामुळे निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पोस्टर बॅलेट द्वारे मतदान करता येईल , अशी व्यवस्था करण्याची निर्देश देण्यात आली आहेत . त्याचबरोबर मतदानापासून निवडणूक कर्तव्य असलेले अधिकारी व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही,  याची दक्षता घेण्याची निर्देश देण्यात आलेली आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *