Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ election duty employee voting paripatrak ] : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या , कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती बाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेली आहे की , निवडणूक संचालन नियम 1961 च्या नियम 18 आणि 18 A त्याचबरोबर नियम 20(1) नुसार , निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या , कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याबाबत तरतुदी करण्यात आलेले आहेत . त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2023 च्या पत्रातील परिपत्रक 14 नुसार सविस्तर सूचना देण्यात आलेले आहेत .

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये राज्यात पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते , त्यावेळी सुविधा केंद्रावर मतदान केलेल्या अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांच्या टपाली मतपत्रिकांचा अदान प्रदान करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी आलेल्या होत्या , काही टप्प्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या –  त्या मतदारसंघासाठी केंद्रीय समन्वय केंद्र विभाग स्तरावर केली होती व त्याद्वारे अर्ज तसेच टपाली मतपत्रिकांचे आदान प्रदान करण्यात आले होते .

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 एकाच टप्प्यात होणार असल्याने , वेगवेगळ्या मतदार संघात मतदार असलेल्या मात्र निवडणूक कर्तव्यार्थ अन्य मतदारसंघात नियुक्ती दिलेल्या , कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्रपत्र 12 भरून देण्याची शक्यता असल्याने , निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या टपाली मतपत्रिकांची संख्या जास्त प्रमाणात राहणार आहे .

केंद्रीय समन्वय केंद्राचे स्थळ स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहेत त्याचबरोबर निवडणूक कर्तव्यर्थ नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी तसेच अशासकीय कर्मचारी यांना न भरलेले प्रपत्र 12 / 12 अ संबंधित समन्वय अधिकाऱ्यामार्फत उपलब्ध करून देण्यात यावे व उर्वरित प्रक्रिया आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करण्याचे निर्देश देण्यात आली आहे .

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्याकरिता Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *