Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ election duty employee tapali vote paripatrak ] : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका – 2024 निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती बाबत भारत निवडणुक आयोगाच्या दि.31.10.2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्रानुसार , मुख्य निवडणुक अधिकारी , महाराष्ट्र यांच्याकडून दि.15.10.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , कि निवडणुक संचालक नियम 1961 च्या नियम 18 , 20 नुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे ( Postal Ballot Papers ) मतदान करण्याबाबत , तरतुदी करण्यात आलेल्या आहेत , त्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाच्या दिनांक 31.10.2023 च्या पत्रातील परि.14 नुसार सविस्तर सुचना देण्यात आलेल्या आहेत . सदर सुचनांच्या कोटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या संदर्भातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेल्या दिनांकापासून डीईओ लॉगीन वर उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रपत्र 12 व 12 अ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी डाऊनलोड करुन घेण्याचे तसेच प्रपत्र 12 व 12 अ यांचे निवडणूक कतव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती पत्रासोबत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी जास्तीत जास्त प्रमाणांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी सही केलेले प्रपत्र 12 व 12 अ तसेच त्यांच्या मतदार ओळखपत्राची प्रत उपलब्ध करुन घेण्याचे तसेच त्यानंतर सदर कार्यपद्धती मध्ये नमुद केल्याप्रमाणे विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतपत्रिकेबाबत नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्याने आयोगाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रपत्र 12 चे वर्गीकरण विधानसभा मतदार सघ निहाय करण्याचे व आपला मतदार संघ वगळता इतर मतदार संघामध्ये मतदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रपत्र 12 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश ..
व मतदार ओळखपत्राची प्रत स्कॅन करुन ऑनलाईन पद्धतीने NIC च्या सॉफ्टवेअर मार्फत संबंधित कर्मचारी ज्या विधानसभा मतदार संघाचा असेल त्या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे ) Postal Ballot Paper ) मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती बाबतचा सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.