निवडणुक कर्तव्यावर असताना अधिकारी / कर्मचारी जखमी / मृत्यु झाले असताना सानुग्रह अनुदान देणेबाबत अत्यंत महत्वपुण GR !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty employee sanugrah anudan shasan nirnay ] : निवडणुक कर्तव्यावर असताना अधिकारी / कर्मचारी जखमी अथवा मृत्यु झाले असताना , सानुग्रह अनुदान देणे बाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11.04.2019 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार , निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना मृत पावलेले अधिकारी / कर्मचारी यांचे वारस यांना 15 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतुद आहे . तसेच निवडणुकीच्या वेळी कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट , सुरुंग अथवा शस्त्रास्त्राचा हल्ला यांमध्ये मृत पावलेले अधिकारी / कर्मचारी यांच्या वारसांना 30 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतुद आहे .

निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया , नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट , सुरुंग पेरणी , शस्त्रास्त्राचा हल्ला इ. यांमध्ये कायमस्वरुपी अपंगत्व आलेले अधिकारी / कर्मचारी यांना ( यांमध्ये हात , पाय / डोळा गमविणे इ. बाबी समावेश ) 15 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची तरतुद नमुद आहे .

तसेच निवडणुकीच्या कर्तव्यार्थ असताना कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या अधिकारी / कर्मचारी ( हात / पाय / डोळा गमविणे ) यांना 7.50 लाख रुपये सानुगह अनुदानाची तरतुद करण्यात आलेली आहे .

सदरचे सानुग्रह अनुदान हे निवडणुक घोषित झाल्याच्या तारखेपासुन सुरु झाले आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment