Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ election duty employee Randomisation letter ] : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता , आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करणे संदर्भात मार्गदर्शक सूचना संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 18 एप्रिल 2024 च्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता , आहार भत्ता अदा करण्यात येतो . तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करायचा असल्याचे , नमूद करण्यात आले आहेत .
याकरिता काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहेत , यामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष , मतदार अधिकारी इत्यादी पदासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती NIC ने विकसित केलेल्या polling personnal management system (PPMS) या सॉफ्टवेअर मध्ये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर अधिकारी / कर्मचारी यांचे Second Randomisation झाल्यानंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यर्थ नेमणूक झाल्यानंतर , संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असल्याची खात्री करण्याची निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सदर अधिकारी / कर्मचारी यांची पहिली व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसाची हजेरी NIC च्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदवण्यात यावी तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करतेवेळी मतदार अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांची किती दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे . याची नोंद सदर सॉफ्टवेअर मध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .
Third Randomisation झाल्याच्या नंतर सदर अधिकारी / कर्मचारी यांना अदा करावयाच्या रकमेची परिकरणा ही NIC च्या सॉफ्टवेअर मधून करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्यात तयार केली जाईल . सदर नमुना डाऊनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी आहरण व संवितरण अधिकारी यांच्या ज्या बँक खाते आहेत , त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर परिपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.