Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee imp Paripatrak ] : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 निवडणूक कर्तव्यावर असतांना आजारी पडलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करणेबाबत , मुख्य निवडणूक अधिकाी , महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 02 मे 2024 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार , निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी / कर्मचारी हे कर्तव्यावर असतांना आजारी पडल्यास , त्यांची सुश्रुषा अथवा उपचार चांगल्या रुग्णालयात करण्यासाठी व्यवस्था / Tie – ups / Cashless Medical Treatment सुविधा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2024 ला घोषित झालेला आहे , आतापर्यंत 02 टप्यातील मतदान प्रक्रिया पुर्ण झालेली आहे , निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आतापर्यंतच्या काळांमध्ये बऱ्याच जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी / कर्मचारी आजारी पडल्याच्या अथवा मृत झाल्याच्या घटना निदर्शनात येत आहेत .
यास्तव निवडणूक कर्तव्यार्थ असताना आजारी पडलेले अधिकारी / कर्मचारी , CSF , SRPF , BSF अधिकारी / कर्मचारी यांचे आजार व त्यांच्यावरील उपचाराबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदरचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिलेले आहेत . या संदर्भात दिनांक 02 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविसतर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.