Spread the love

live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ Election duty cancellation demand ] : निवडणूक कामकाजामधून काही विशिष्ट कारणासाठी वगळण्यात येते , यामध्ये दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे . परंतु यंदाच्या वेळी अधिकारी / कर्मचारी यांची कमतरता लक्षात घेऊन अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांना देखील निवडणूक कामकाजाचे आदेश देण्यात आलेले आहे .

अधिकारी / कर्मचारी अपंग असल्यास अपंगाच्या टक्केवारीनुसार संबंधित निवडणूक अधिकारी मान्यतेनुसार, निवडणूक कामकाजातून वगळण्यात येते . यंदाच्या विधानसभा निवडणुकीकरिता बरेच नव्याने मतदान केंद्राची स्थापना केल्याने , अधिकारी /  कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये , याकरिता अपंग दिव्यांग कर्मचारी यांना देखील निवडणूक कामकाजाचे आदेश देण्यात आलेले आहेत .

परंतु 50 टक्के पेक्षा अधिक अपंग असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजातून वगळण्याची मागणी करण्यात येत आहे . त्याचबरोबर दिव्यांग असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाजातून पूर्णपणे वगळण्याची मागणी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केली आहे .

त्याचबरोबर काही कार्यालयांकडून निवडणुकीचे आदेश रद्द करण्यासाठी दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे , यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांची नमुद केले आहे .

राज्य शासनांच्या सा.प्र.विभाग मार्फत दि.19.04.2024 रोजीच्या पत्रानुसार नमुद दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणुक कामकाजातुन वगळण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . त्यानुसार कार्यवाही करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , अन्यथा न्यायालयांमध्ये जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *