Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ edible oil price increase news ] : येन दिवाळीच्या काळांमध्येच खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे , यामुळे दिवाळी सणासाठी आवश्यक खाद्यतेल खरेदीकरीता , अधिकच रक्कम आता सर्वसामान्यांसाठी मोजावे लागणार आहेत . नविन खाद्यतेलाच्या किंमती कश्या आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

दिवाळी सणांमध्ये खाद्यतेलाची मोठी मागणी असते , कारण दिवाळीत फराळ , गोडधोड पदार्थ करण्यासाठी , तेलाची आवश्यक असते . यामुळेच खाद्यतेलाच्या किंमती ह्या मागणीनुसार वाढ होत आहे . यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे .

खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिकिलो मागे 25-30 रुपयांची वाढ झालेली आहे , नुकतेच केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या आयात शुक्ल वाढीमुळे सदर किंमत वाढ झालेली आहे . केंद्र सरकारने पाम तेल , सुर्यफल तेल यांच्या आयात शुल्कांमध्ये 20 टक्क्यांची वाढ केली आहे , तर रिफाइाड सुर्यफुल व सोयाबीन तेलाच्या आयात शुल्क यांमध्ये 35.75 टक्के वाढ करण्यात आलेली आहे .

या आयात शुल्क वाढीमुळेच खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो मागे 25-30 रुपयांची वाढ झालेली आहे . यामुळे सोयाबीनचे सुधारित दर हे 125/- प्रति किलो झाले आहे , यापुर्वी 110/- रुपये असे होते . तर सुर्यफुल तेलाच्या किंमतीत 125/- रुपये वरुन 140/- ते 145/- रुपये प्रति किलो किंमत पोहोचली आहे .

तर शेंगदाणा तेलाच्या किंमतीत 160/- रुपये वरुन 190/- रुपये प्रति किलो झाले आहे . हे प्रमाण सध्या 15 किलो तेलाच्या डब्याचे प्रमाण लक्षात घेतले असता , सुर्यफुल तेलाचे जुन्या डब्याची किंमत ही 1750/- रुपये होती आता ही किंमत 2140/- रुपये अशी वाढली आहे , तर सोयाबीनच्या जुन्या डब्याची किंमत ही 1600/- रुपये होती तर आता सुधारित दर हे 2050/- रुपये अशी झाली आहे , तर पामतेलाच्या डब्याची किंमत ही 1600/- रुपये वरुन 1850/- रुपये अशी झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *