Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Earthquake in hingoli district ] : हिंगोली जिल्ह्यामधील रामेश्वर तांडा परिसरामध्ये परवा दिनांक 13 नोव्हेंबर रोजी भूकंपाचे सौम्य हादरे जाणवले आहेत . यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे , प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आली आहे .

दिनांक 13 नोव्हेंबर 2024 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजुन 22 मिनिटे दरम्यानच्या कालावधीमध्ये कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा , वारंगा फाटा , बाळापुर दिग्रस , दांडेगाव , जवळा पांचाळ या परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत . यामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत .

मागील महिन्यातच सदर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते , तर पुन्हा एकदा बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवल्याने , गावागावांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहेत . याबाबत प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला असून , सुरक्षितेबाबत आवश्यकता पूर्व सूचना दिल्या आहेत .

मागील बऱ्याच भूकंपाच्या धक्क्यानुसार , सदर भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा हे असल्याचे स्पष्ट झाले आहे . माहे ऑक्टोबर महिन्यामध्ये , झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सावरगाव हे होते , त्यावेळी भूकंपाची तीव्रता 3.8 रेस्टर इतकी जाणवली होती .

सतत होणाऱ्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यामुळे गावागावात भीतीचे वातावरण पसरत आहेत , याबाबत सतर्कतेसाठी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *