Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Dragon Fruit Lagawad Info ] : ड्रॅगन फळाची मागणी विदेशांमध्ये प्रचंड आहे , या पिकांस दिवसेंदिवस आता भारतांमध्ये देखिल मोठी मागणी येत आहे . हे फळचे मुळ दक्षिण अमेरिका , मेक्सिको असून या फळाची लागवड ही थायलंड , मलेशिया , व्हिएतनाम , इंडोनेशिया आणि फिलीपिन्स त्याचबरोबर भारतासारक्ष्या पाश्चात्य देशामध्ये या फळाची लागवड केली जाते .
देशांमध्ये विचार केला असता महाराष्ट्र , कर्नाटक , तामिळ , गुजरात , केरळ व आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये या फळाची लागवड करण्यात येते . या फळास इंग्लंड , अमेरिका , तसेच युरोपिय देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे . यामुळेच या पिकास डॉलरमध्ये भाव मिळतो , म्हणजेच ड्रॅगन फळ लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल नाही तर चौपट होईल .
ड्रॅगन फळ फायदे / वापर : ड्रॅगन फळ हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशि फळ आहे , या फळामुळे संधिवात , मधुमेह , कर्करोग , दमा अशा प्रकारचे रोग नियंत्रित होण्यास मदत होते . त्याचबरोबर आपले अन्न पचविण्याची क्षमता अधिक चांगली होते , तसेच या फळांमध्ये सर्वाधिक जीवनसत्वे , खनिजे व प्रथिने असते . या फळाचा वापर जॅम , आईस्क्रीम , जेली तसेच वाईन तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते . या फळांमुळे आपल्या आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते .
ड्रॅगन फळसाठी आवश्यक हवामान : ड्रॅगन फळ साठी 20-30 अंश सेल्सिअस इतके तापमान व भरपुर सूर्यप्रकाशाची आवश्यक असते . तर या फळास 100 ते 140 सेंटीमीटर पावसाची आवश्यकता असते , तर सेंद्रिय खतापासून या पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते . साधारणपणे हे पिक 18-24 महिन्यांच्या आसपास फळ देते , तर फळ हे त्यानंतर 30-50 दिवसांमध्ये परिपक्क होते , फळाची काढणी ही 3-4 वेळा केली जाऊ शकते .
बाजार भाव : ड्रॅगन फळाला प्रति क्विंटल सरासरी 11,750/- रुपये इतका भाव आहे ,प्रति एकरी 10 टन इतके उत्पादन होते , म्हणजेच एकरी उत्पन्न हे 11,75,000/- रुपये इतका होईल . ड्रॅगन फळाचे झाड एका वेळी लावल्यास , वीस वर्षापर्यंत फळ देण्यास सक्षम असते .