Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Divorce amount paid to husband ] : आपला देश हा पितृसत्ताक देश असल्याने , बरेच कायदे हे स्त्रीयांच्या रक्षणांसाठी बनविण्यात आलेले आहेत . परंतु आपल्या देशात काही कायदे हे काही विशिष्ट आदिवासी भागाकरीता लागु होत नाही .
आपल्या संविधानात तशी नमुद करण्यात आलेली आहे , कारण आदिवासी समुदाय हा प्राचीन काळापासून आपली संस्कृती टिकवून आहे , त्यांना त्यांची संस्कृती पुढे टिकविण्यासाठी संविधानात तशी तरतुद करण्यात आलेली आहे . याच तरतुदीमुळे काही भागात आदिवासी महीलांना घटस्फोटासाठी पुरषांना पैसे द्यावे लागते .
ही प्रथा आपल्या देशातील मध्य प्रदेश राज्यतील राजगढ जिल्हा भागात आहे , या भागात लग्न करण्यासाठी झगडा नातरा प्रथा आहे , तर बालविवाह ही प्रथा सऱ्यास सुरु आहे . तर लहानपणीच बालविवाह ठरविल्याने , पुढे वयात आल्यास त्यांचा विवाह लावण्यात येतो , परंतु एकदा बालविवाह ठरुन पुन्हा नकार दिल्यास , समाज वाळीत टाकण्याची मोठी पद्धत आहे .
तर तसे घडल्यास , पुन्हा विवाहास अडचणी निर्माण होतात , यामुळे जर मुलींना बालविवाहाचे स्थळ न आवडल्यास , पुरुषांनाच पैसे देवून प्रकरण मिटवावे लागत असल्याचे अनेक घटना सदर भागात घडत असल्याचे समोर आले आहेत . यांमध्ये ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत ,त्या मुली या प्रथेचा विरोध करुन आपल्या पसंतीच्या जोडीदारासोबत लग्न करण्यास पसंती देत आहेत . तसेच काही समाज सुधारक देखिल सदर प्रथेला विरोध करत आहेत .
सदरची प्रथा ही ज्या भागांमध्ये विकास नाही / मागसलेले गाव आहेत , अशाच भागांमध्ये असे प्रकरण घडतात . कारण राजगढ जिल्ह्याचे बऱ्याच भाग हा अतिदुर्गम भाग आहे , या ठिकाणी 52 टक्के महिला ह्या अशिक्षित आहेत .
नेमकी प्रथा काय आहे ? : जाणकारांच्या सांगण्यानुसार , सदरची प्रथा ही तब्बल 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासुन सुरु आहे . झगडा नातरा या प्रथेमध्ये पुरुष – महिला लग्न न करताच एकत्र राहतात , तर मुल झाल्यानंतर देखिल ते लग्न करतात . या प्रथेमध्ये पुरुषांचा मृत्यु झाल्यास , महिलांना पुनर्विवाहाची संधी मिळायची .
परंतु सध्या या प्रथेमध्ये सौदेबाजी केली जात आहे , बालविवाह नंतर स्त्री-पुरुषांमध्ये तणाव निर्माण झाल्यास , सदर प्रकरणी मिटवण्याकरिता मुलीकडून पैसे घेण्याचे प्रमाण वाढत चालली आहे .