Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ divali festival leave news ] : यंदा दिवाळीच्या सुट्ट्या 14 दिवस राहणार आहेत , याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहेत . तसेच यंदाच्या वर्षी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहेत या संदर्भातील अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार यंदाच्या वर्षी दिवाळीच्या सुट्ट्या ह्या 28 ऑक्टोबर पासून लागणार आहेत , ह्या सुट्ट्या 09 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहेत  परंतू दि. 10 नोव्हेंबर रोजी रविवार आल्याने , दिवाळीच्या एकूण 14 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत .

शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत प्रथम सत्र परीक्षा होणार आहे , त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या दिले जाणार आहेत . दिवाळीच्या सुट्ट्या 10 नोव्हेंबर पर्यंत राहणार असून , 11 नोव्हेंबर पासून पुन्हा शाळा सुरू होणार आहे . म्हणजेच शिक्षक / विद्यार्थ्यांना एकूण 14 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या मिळणार आहेत .

दहावी , बारावीच्या बोर्ड परीक्षा यंदा फेब्रुवारी महिन्यात : यंदाच्या वर्षी बारावी व दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरुवात होणार आहेत . यामध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळामध्ये होणार आहेत , तर दिनांक 14 जानेवारीपासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेतले जाणार आहेत .

तर दहावीच्या बोर्ड परीक्षा यंदाच्या वर्षी दि. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च पर्यंत होणार आहेत . तत्पूर्वी दिनांक 03 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान सदर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा होणार आहेत , याबाबत बोर्डाकडून अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *