Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee New Pension Scheme VS New Pension Pension Scheme ] : राज्यातील सर्वच एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना काल दिनांक 01.03.2024 रोजी विधानसभेमध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे नविन सुधारित पेन्शन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे . या नविन पेन्शन प्रणालीमध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे काही लाभ लागु आहेत , परंतु काही लाभ जुनी पेन्शन प्रमाणे नाहीत . यामधील नेमका फरक कोणता आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या नंतर शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन तर सेवानिवृत्ती पश्चात मृत्युनंतर परिवारास 60 टक्के कुटुंब निवृत्ती वेतन देण्याची मोठी घोषणा काल दिनांक 01.03.2024 रोजी मा.मुख्यमंत्री यांनी केली आहे . मात्र या सुधारित पेन्शन योजनांमध्ये काही अटी व शर्ती आहेत , ज्यामुळे या सुधारित पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ अनुज्ञेय होत नाहीत .
या मध्ये नमुद आहेत कि , कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून देण्यात आलेली सेवा गृहीत न धरता जितके वर्ष कर्मचाऱ्यांने पगारामधून 10 टक्के रक्कम कपात केली तितके वर्ष त्यांची सेवा धरुन पेन्शन देणे त्याचबरोबर वेतनातुन 10 टक्के रक्कम सक्तीने नापरतावा वसुल करणे , जुन्या पेन्शन नियम 1982-84 च्या विरुद्ध आहे . तसेच पुर्णसेवा निवृत्तीवेतन तसेच भरपाई निवृत्तीवेतन , जखम अथवा इजा निवृत्ती वेतन , अनुंकपा निवृत्तीवेतन , या सारख्या जुन्या पेन्शन मधील लाभांचा समावेश या सुधारित पेन्शन प्रणालींमध्ये करण्यात आलेला नाही .
तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर 40 टक्के पेन्शन चे अशंराशिकरण करण्याची सुविधा यांमध्ये नाही , जे कि जुन्या पेन्शन प्रणालीमध्ये आहे . तसेच निवृत्तीनंतर भविष्यांमध्ये लागु करण्यात येणारे वेतन आयोग नुसार निवृत्ती वेतन आणि भत्यांमधील वाढ करण्याचा समावेश नाही .तसेच भविष्य निर्वाह निधी प्रमाणे अंशत : व पुर्ण परताव्यासह रक्कम काढण्याच्या आर्थिक योजनेचा अभाव सदर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये आहे .
तसेच विकल्पाने DCPS / NPS आणि खात्रीशीर पेन्शन ( GPS ) असा कर्मचाऱ्यांमध्ये भेदाभेद होणार आहे .या निर्णयामुळे समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन देण्याचे अन्यायी धोरण असल्याचे सांगण्यात येत आहेत .
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत यासंदर्भात प्रसिद्धी करण्यात आलेले सविस्तर पत्रक पुढील प्रमाणे पाहु शकता ..