Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ dhvajdin Nidhi Kapat Paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल पेड इन मे महिन्यांच्या वेतन देयकातुन ध्वजदिन निधी 2024 रक्कम संवर्गनिहाय कपात करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर परिपत्रकांनुसार राज्यातील कोषागार कार्यालयांना सदर निधींची रक्कम कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
मा.जिल्हाधिकारी , नाशिक यांचे संदर्भाधिन पत्रांनुसार जिल्हा कोषागार कार्यालय , नाशिक यांच्या दिनांक 12 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार सशस्त्र ध्वजदिन 2023 निधी संकलन करणेबाबत निर्देश आहेत , यांमध्ये संवर्ग निहाय निधींचे संकलन करणेबाबत सर्व कार्यालयांना सुचित करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये अधिकारी वर्ग – 1 पदांच्या वेतनातुन 800/- रुपये , अधिकारी वर्ग – 2 पदांच्या वेतनातुन 600/- रुपये तर कर्मचारी वर्ग – 3 व तत्सम कर्मचाऱ्यांच्या वेतनांतुन 400/- रुपये तर कर्मचारी वर्ग – 4 व तत्सम कर्मचारी वेतनांतुन 200/- रुपये तर सामान्य नागरिक स्वेच्छेनुसार निधींचे संकलन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदरचा निधी कार्यालयनिहाय संकलित झाल्याची खात्री करुनच माहे एप्रिल 2024 देय मे 20204 या महिन्यांचे वेतन देयके स्विकृत करण्याचे निर्देश मा.जिल्हाधिकारी यांचे असल्याने , माहे एप्रिल 2024 देय मे 2024 या महिन्यांचे वेतन देयक सादर करतांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ध्वजदिन निधी 2023 भरल्याच्या पावतीची प्रत प्राप्त करुनसदर मूळ पावतीची प्रमाणित सत्यप्रत कोषागार / उपकोषागार कार्यालयाच्या देयक स्विकृती खिडकीवर उपलब्ध करुन देण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.