Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Dhananjay munde ] : बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप विरोधांकडून केला जात आहे . यामुळे त्यांची चौकशी करण्याकरीता मंत्रीपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
सदर प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यु प्रकरणावर धनंजय मुंडे यांना थेट निशाणा साधल्याने , धनंजय मुंडेचे मंत्रीपद धोक्यात असल्याचे दिसून येत आहे . तर या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात असून , त्याला मदत म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव जोडले जात आहेत .
हे प्रकरण कोणत्याही पक्षाचे नसुन सरपंच संतोष देशमुख यांना न्याय दिला जावा व जे खुनी आहेत , त्यांना शिक्षा झालीच पाहीजे याकरीता धनंजय मुंडे यांची निपक्षपणे चौकशी व्हावी , याकरीता त्यांना त्यांच्या मंत्रीपदाचा त्याग करावा लागणार आहे .
तर या पाठीमागे नेमके कोणाचे हात आहे , तर एकाच मतदार संघातुन व एकाच कुटुंबातुन दोघांना मंत्रीपदे दिल्याने , हे प्रकरण होत असल्याचे अनेक जण बोलले जात आहेत . कारण पंकजा मंडे व धनंजय मुंडे हे एकाच मतदार संघातील असून , त्या दोघांना देखिल कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आलेली असल्याने , अनेक ज्येष्ठ आमदार नाराज आहेत .
पंकजा मुंडे ह्या लोकसभेत पराजित झाल्या असून , त्यांना विधानपरिषदेत स्थान देण्यात आले असल्याने , त्यांना मंत्रीपद दिले गेले आहेत .