Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Dairy Business Story ] : आजकाल तरुण पिढी शेतीपुरक व्यवसायाकडे अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत , ज्यामुळे समाधानकारक आर्थिक फायदा होताना दिसून येत आहेत . अशीच बातमी राहुल पाटील यांची आहे , राहुल पाटील हे दुग्ध व्यवसायातुन तब्बल 1.50 लाख रुपये प्रतिमहा कमवत आहेत .

मराठवाड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहेत , कारण मराठवाड्यांमध्ये कायम दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असते , परंतु याच भागातील जिल्हा धाराशिव तालुका कळंब येईल शिराढोण गावातील तरुण शेतकरी राहुल पाटील यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेतांमध्ये 15 म्हशींच्या उत्तम रित्या / आधुनिक पद्धतीने गोठा नियोजन करुन प्रकल्प उभा केला आहे .

ज्यामधून राहुलला प्रतिमहा 1 लाख ते 1.50 लाख रुपये पर्यंतचा आर्थिक लाभ मिळत आहे. त्याचे उत्तम नियोजन यामागचे यशाचे कारण आहेत . राहुल पाटील यांची शिराढोण येथे 05 एकर शेती आहे , त्यांनी या शेतीमध्ये 05 वर्षांपुर्वी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरु केला होता . सुरुवातीच्या वेळी त्याच्याकडे 01 म्हैस होती ,आज 15 म्हैस पर्यंत मजल मारली आहे . राहुलला या व्यवसायांमध्ये आवड होतील , म्हणून त्याचे प्रयत्न पणाला लावून काम केल्याने , आज यशस्वी आहे .

त्याने म्हशींच्या संगोपन करीता स्लॅब गोठा तयार केला आहे , या 15 म्हशींच्या माध्यमातुन त्यांना सकाळच्या व सायंकाळच्या वेळी मिळून असे एकुण 100 लिटर दुध निघते , हे दुध ते ग्राहकांना घरपोहोच देतात , त्यांमुळे त्यांना दुधाला 70/- रुपये इतका चांगला भाव मिळतो .

या शिवाय त्याला शेणाखतापासुन प्रतिवर्षी 2.5 लाख रुपये पर्यंत फायदा होतो . 15 म्हशींपासुन प्रतिमहा 4 ट्रॅक्टर तर वर्षाला सुमारे 50 ट्रॅक्टर पर्यंत शेणखत मिळतो , प्रति ट्रॅक्टर 5,000/- रुपये भाव प्रमाणे शेणखत विकला जातो , त्यापासुन वर्षाला 2.5 लाख रुपये पर्यंतचा आर्थिक लाभ मिळतो ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *