रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.25 मे 2023

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेमध्ये रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत , राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभागांकडून दि.25 मे 2023 रोजी एक महत्वपुर्ण शासन परिपत्रक (shasan Paripatrak ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये कार्यरत रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . तसेच सर्व अपर आयुक्त आदिवासी विकास तसेच सर्व प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना मा.न्यायालयात याचिका दाखल केलेले जे रोजंदारी तासिका तत्त्वावरील कर्मचारी हे मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र आढळतील अशा रोजंदारी कर्मचाऱ्यांना ते अपात्र असल्याबाबतची कारणे कळवून सदर कार्यवाही विविध मुदतीत पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले आहेत .

आदिवासी विकास विभागाच्या संदर्भ क्रमांक 01 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने 01 वर्षापेक्षा अधिक खंड असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात आले असल्यास , याबाबत आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी सर्व अप्पर आयुक्त आदिवासी विकास तसेच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित केल्याच्या आदेश प्राप्त करून घेऊन त्याची तपासणी करून त्याबाबतची वस्तूस्थिती तात्काळ राज्य शासनास सादर करणारी करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

आता रोजंदारी / तासिका तत्वावर नियुक्ती नाही : त्याचबरोबर सर्व अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना सदर परिपत्रकांना नुसार कळविण्यात येते की आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा वस्तीगृहामध्ये सन 2023- 24 च्या शैक्षणिक सत्रापासून एकही कर्मचारी रोजंदारी / तासिका तत्त्वावर घेण्यात येऊ नये . आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार शासकीय आश्रमशाळा / वसतीगृहामध्ये बाह्य स्त्रोताद्वारे मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबत नमूद केले आहेत , त्यानुसार आवश्यकता भासल्यास , बाह्यस्त्रोताद्वारे सेवा उपलब्ध करून घ्याव्यात सदर सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे .

आपण जर शासकीय , निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी , पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !

Leave a Comment