Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ daily wages / period basis employee news ] : राज्यातील विविध विभागांमध्ये रोजंदारी / तासिक तसेच कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत , यापैकी आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील / वसतीगृहातील ज्यांची सेवा ही 10 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्षे झालेली आहे , अशा रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांकरीता धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत , आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 27 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील / वसतीगृहातील रोजंदारी / तासकिा तत्वावरील एकुण 1585 कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील / वसतीगृहातील रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयात दाखल विविध यांचिकांपैकी 27 याचिकांप्रकरणी मा.न्यायालयाने एकत्रितपणे दिनांक 19.10.2022 रोजी दिलेल्या निर्णयान्वये सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबत दिनांक 09 मार्च 2023 रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात आले आहेत .
मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत एक वर्षे आणि त्यापेक्षा जास्त कालावधीचा खंड असेल , तथापि अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा 10 वर्षे अथवा त्याहून अधिक झालेल्या असेल , तरी अशा कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आलेले नाही .तथापि ज्या रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा 10 वर्षे अथवा त्याहून अधिक झालेल्या आहेत , त्यांना मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक 31.10.2018 रोजीच्या आदेशानुसार शासन सेवेत नियमित करणे आवश्यक आहे .
तरी उक्त वस्तुस्थिती विचारात घेता दि.06.02.2023 रोजीच्या शासन निर्णयात नावे समाविष्ट असलेल्या आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील / वसतिगृहातील रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये एक वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त खंड आहे , मात्र अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा 10 वर्षे अथवा त्याहून अधिक झालेल्या आहेत , अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा 10 वर्षे अथवा त्याहून अधिक झालेल्या आहेत , अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ शासन सेवेत नियमित करण्याचे यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.