Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ daily wages & period basic employee permanent shasan nirnay ] : रोजंदारी / तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 08 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .  

आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी / तासिका तत्वावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार शासन सेवेत नियमित करण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे .

सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर पदावर रोजंदारी / तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केले आहे , असे याचिकाकर्ते कर्मचारी मा. न्यायालयाच्या निर्णयात नमुद बाबींच्या पुर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर निर्णयांमध्ये नमुद केलेल्या दिनांकापासून शासन सेवेत नियमित करण्यात येत आहेत .

तसेच यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत , कि संबंधित नियुक्ती प्राधिकारी ( यांमध्ये अपर आयुक्त / प्रकल्प अधिकारी ) यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी व शैक्षणिक अर्हता यांची तपासणी करुन तसेच बिंदु नामावलीनुसार रिक्त पदे विचारात घेवून नंतरच नियमितकरणाचे आदेश पारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि.20 ऑगस्ट 2020 रोजीच्या आदेशानुसार नियमितकरण करण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्यांचे नियमितकरण केल्याच्या नंतर सदर पदावर रुजु झाल्याच्या दिनांकापासुन 05 वर्षांच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल , अन्यथा शासनांकडून त्यांच्या सेवा ह्या समाप्त करण्यात येतील , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील दिनांक 08 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *