Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Daily Wages / Period Bases Employee birhad maha strike ] : राज्यातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे दिनांक 10 जुन पासुन थेट मुंबई पर्यंत बिऱ्हाड महा-आंदोलन होणार आहेत . यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पुर्ण व्हावेत , याकरीता सदरचे महा-आंदोलन करण्यात येत आहेत .

महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष श्रीमती योगिताबाली लक्ष्मण पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 जुन 2024 पासुन थेट मुंबई पर्यंत बिऱ्हाड महा-आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर रोजंदारी / तासिका कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

प्रमुख मागण्या : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये कार्यरत रोजंदारी / तासिका वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी यांचे धोरणात्मक निर्णय घेवून थेट विनाअट सरसकट समायोजन करावे , तसेच रोजंदारी वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जिवित करणे व दिनांक 16 नोव्हेंबर 2022 चा सुधारित आकृतीबंध रद्द करावा , अशा प्रमुख मागण्या आहेत .

सदरचे बिऱ्हाड आंदोलन हे दिनांक 10 जुन 2024 पासुन आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक ते मुंबई मंत्रालय मार्फत जाणार आहे .अशा प्रकारचे बिऱ्हाड महाआंदोलन मागील वर्षी देखिल सदर कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले होते , परंतु तोडगा न निघाल्याने , सदर रोजंदारी / तासिका कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा कायम असल्याने , अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *