Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Daily havaman Andaj Upto 14 jun ] : देशांमध्ये मान्सुनची केरळमध्ये दमदार आगमन झाले असून , कोकणांमध्ये मान्सुन सऱ्यांचे आगमन झाले आहे ,येत्या 14 जुन पर्यंत राज्यांमध्ये वातावरण कसे असेल , याबाबत हवामान खात्यांकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . याबाब दिनांक 14 जुन पर्यंतचा सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पुढील दोन दिवस राहील उन्ह्याच्या झळा : आज व उद्या दिनांक 01 जुन पर्यंत राज्यांमध्ये उन्हाच्या झळा असतील परंतु तापमान देखिल घटणार आहे . तर दिनांक 02 जुन पासुन वातावरण हे ढगाळ तसेच दमट राहील . या दरम्यानच्या कालावधीमध्ये  तापमान हे 40 अंश सेल्सिअस वरुन 38 अंश सेल्सिअस इतका तापमान कमी होईल .

या तारखेला मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात : राज्यांमध्ये दिनांक 03 जुन ते दिनांक 11 जुन पर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे , तर कोकणांमध्ये 8 जुन पासुन नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासून पाऊस पडेल , तर उर्वरित राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल .म्हणजेच कोकणांमध्ये मान्सुन आगमना नंतर अवकाळी पावसाचे प्रमाण कमी होईल .

दिनांक 12 जुन पासुन राज्यात सर्वत्र मान्सुन पसरणार : कोकणांमध्ये दिनांक 8 जुन पर्यंत मान्सुनचे आगमन होईल , त्यानंतर मान्सुन हे राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये 12 जुन पासुन सक्रिय होणार आहे , 13 जुन रोजी राज्यात पावसाच्या सरी सुरु होतील , तर 14 जुन रोजी राज्यांमध्ये सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात होईल .

असा अंदाज भारतीय हवामान खात्यांकडुन वर्तविण्यात आलेला आहे , यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करीता जमीनीची पुर्व मशागत करुन ठेवावी . जसा पावसापासुन उजाडा मिळेल , तशी पेरणी करुन घेणे आवश्यक असेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *