लाईव्ह मराठी पेपर : संगिता पवार ( डी.ए अपडेट ) – सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगत आहेत . या मुद्द्यावर सोशल मिडियावर अनेक अपडेट येत आहेत . परंतु आता सरकारकडूनच डी.ए वाढीबातच्या मुद्द्यावर खुलासा करण्यात आला आहे .
केंद्र सरकारकडून माहे जानेवारी 2023 मध्ये डी.ए चार टक्के वाढ लागु केली , माहे जुलै 2023 मध्ये देखिल केंद्रीय कर्मचाऱ्यांना आशा होती कि , परत एकदा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढेल . परंतु महागाई भत्ता मध्ये तीन टक्के वाढ केली जाणार असल्याची माहिती सरकारकडून येत आहेत . कारण ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारानुसार डी.ए वाढ ही 3.21 टक्के होत आहे .
यामुळे परत एकदा जुलै 2023 मध्ये 4 टक्के महागाई भत्ता वाढीची कर्मचाऱ्यांची अपेक्षा भंगणार असून , जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता डी.ए फरकासह लागु होणार आहे .
सध्याच्या घडीला केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराने डी.ए दर लागु आहे , आता यांमध्ये परंत एकदा माहे जुलै 2023 मध्ये 3 टक्क्यांची वाढ होईल . ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के वरुन 45 टक्के होणार आहे .सदर महागाई भत्तावाढ बाबतचा केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून पुढील महिन्यात अधिकृत कार्यालयीन ज्ञापन प्रसिद्ध केला जाईल .
पुढील महिन्यांपासून सदर 3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु झाल्यास , कर्मचाऱ्यांना / सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जूलै , ऑगस्ट महिन्यांतील डी.ए फरकाची रक्कम वेतन / पेन्शन देयकासोबत अदा केली जाणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !