अखेर राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता (DA ) मध्ये 4% वाढीला राज्य शासनाकडून मंजुरी !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे एसटी कर्मचऱ्यांचा आता महागाई भत्त्यात वाढ करण्यात आला आहे . त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे ही बातमी एसटी महामंडळातील सर्व कर्मचऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.एसटी कर्मचऱ्यांचा महागाई भत्ता 34% वरुन 38% करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली आहे .

या निर्णयामुळे राज्यातील सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार आहे असल्याचे वित्त विभागाकडून नमुद करण्यात आले आहेत . सदर DA वाढीमुळे राज्यातील सरकारच्या तिजोरीवर 9 कोटी रुपयांच्या बोजा पडणार आहे , असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .आता एसटी कर्मचऱ्यांचा राज्यसरकार कडून वेतनासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% ने वाढ करण्यात आलेले आहे.

एसटी कर्मचाऱ्याना रात्र दिवस किती परेशान व्हावा लागतो यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचऱ्यांना गणेश उत्सवाचा एक बोनस मिळालेला आहे . त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात खुश आहेत .

ह्या निर्णयामुळे राज्यातील तिजोरीवर बोजा पडत असला तरीही चालेल , पण ST कर्मचाऱ्याना इतर शासकीय राज्य कर्मचारी प्रमाणे , DA लाभ लागू करण्यात येईल , असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment