DA Hike : अलीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत यासोबतच घर भाडेभत्याबाबत आणि वेतन आयोगाबाबत विविध महत्त्वाच्या चर्चा आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आलो आहोत. सर्वसाधारणपणे शासनांतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता ज्या काही सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जात आहेत ते पूर्णपणे सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून नागरिकांना दिले जात आहेत. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिले जात आहेत. सध्या तब्बल 42 टक्क्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जात असून जानेवारी महिन्यापासूनच हा भत्ता दिला जात आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्या बाबत अशी अपेक्षा होती की महागाईबत्त्यामध्ये फक्त चार टक्क्यांची वाढवावी परंतु यामध्ये आता जुलै महिन्यापासूनच चार टक्के नाही (DA Hike news). तर तीन टक्के वाढ होणार असल्याची बातमी समोर आली आहे. म्हणजेच आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 42 टक्क्यांवरून 45 टक्क्यांवर वाढ झाली आहे.
राज्यभारातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्यातील वेदनाबाबत खुशखबर! पहा प्रशासनाचा जीआर;
याची मोठी घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून झाली नाही. परंतु पुढील काही दिवसांमध्ये ही घोषणा होण्याची मोठी शक्यता दिसत आहे. तीन टक्के महागाई भत्त्याची वाढ ही जुलै महिन्यापासूनच लागू केली जाणार असून महागाई भत्तेबाबत हे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे (DA Hike maharashtra). त्यासोबतच आता पुढील काही दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये त्यासोबतच घर भाडे भत्त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीचा आपण सखोल अभ्यास केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काय महागाई भत्ता दिला जात आहे (DA Hike central govt). तो पत्ता 50% पर्यंत पोहोचतो आणि तिथून पुढे शून्यावर येतो परंतु याच पार्श्वभूमीवर महागाई भत्ता हा 50% पर्यंत पोहोचला की तिथून पुढे घर भाडे भत्ता देखील तितकाच वाढणार आहे.
पेट्रोल वरची गाडी झाली इलेक्ट्रिक! हे खास किट तुमच्या गाडीमध्ये आजच बसवा आणि पेट्रोलची चिंता संपवा;
याचा अर्थ असा होतो की जुलै 2024 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 50% चा आकडा पार पडल्याचे आपल्याला दिसेल यामध्ये मिळालेल्या माहितीचा पूर्णपणे आपण विचार केला तर 2024 मध्ये तीन टक्के घर भाडे भत्ता हा शासकीय कर्मचाऱ्यांना प्रदान केला जाईल. याआधी बघितले तर 2021 मध्ये सुद्धा घर भाडे भत्ता वाढवला होता…
सध्या मिळतोय इतका घर भाडे भत्ता;
सध्या मिळत असणाऱ्या घर भाडे भत्त्याचा सखोल विचार केला तर तो पूर्ण पणे विविध शहरांच्या घडामोडींवर अवलंबून असतो. म्हणजेच जे शासकीय कर्मचारी ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत (DA Hike news maharashtra). त्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या नऊ टक्के तर जे शासकीय कर्मचारी शहरी भागांमध्ये काम करत आहेत तरच त्यांना पगाराच्या अठरा टक्के व जे शासकीय कर्मचारी मोठमोठ्या शहरांमध्ये म्हणजेच महानगरांमध्ये काम करत आहेत त्यांना त्यांना जितका पगार असेल त्याच्या 27% इतका घर भाडे भत्ता दिला जातो.
जर प्रशासनाने दिलेल्या घरभाडे व त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली तर अशावेळी महानगरांमध्ये काम करत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हा तब्बल 30% होईल आणि शहरी भागांमध्ये 20% तर ग्रामीण भागामध्ये 12 टक्के इतका घर भाडे भत्ता प्रशासनाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना दिला जाईल. त्यामुळे आता या प्रशासनाच्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूपच मोठा फायदा होणार आहे..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !