Spread the love

DA Hike :- केंद्र शासना अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असे मुद्दे म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता, सोबतच वेतन आयोग व घरभाडे भत्ता हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीबाबत विविध बातम्या आणि चर्चा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाले असतील (DA Hike latest news in marathi). परंतु आजच्या लेखांमध्ये आपण फुल्ल अँड फायनल माहिती जाणून घेणार आहोत. तरी जास्तीत जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करावी आणि हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

कित्येक जण आपापला मजकूर महागाई भत्त्याच्या वाढीबाबत लावत आहेत. कोण म्हणत आहेत तीन टक्के वाढ होईल तर कोण म्हणत आहेत चार टक्क्यांची वाढ महागाई भत्त्यात होईल (DA Hike for central government employees). जवळपास एक कोटी पेक्षाही अधिक शासकीय कर्मचाऱ्यांकरिता सोबतच पेन्शन धारक नागरिकांकरिता एक खुशखबर बातमी आपल्यासमोर येत असून, आता हा जो काही महागाई भत्ता आहे त्यामध्ये तीन टक्के नव्हे तर चार टक्क्यांची वाढ ही पूर्णपणे होणार असून हे निश्चित समजले जात आहे. याविषयी अधिक माहिती आता आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेल तरीही नागरिकांनी चार टक्के महागाई भत्ता ग्राह्य धरायला हरकत नाही.

फक्त 10 हजार रुपयात मिळवा इलेक्ट्रिक स्कूटर! एका चार्जिंग मध्ये धावणार 160 किलोमीटर; पहा सविस्तर;

महागाई भत्त्यात होणार चार टक्क्यांची वाढ;

केंद्रांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये 42% इतका महागाई भत्ता याच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असून सध्याची महागाई ही खूपच वाढत चालली आहे. महागाई स्थिती वाढत चालल्यामुळे 120 दिवसानंतर जो काही महागाई भत्ता असेल तो 50% पर्यंत वाढू शकतो अशी सुद्धा शक्यता कित्येक तज्ञ लोकांनी वर्तवले आहे (DA Hike news maharashtra). जर महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला तर बाकीचे मिळणारे सर्व भत्ते नक्कीच 25% ने वाढतील. असा सुद्धा मजकूर अनेकांनी लावला. सर्वसाधारणपणे पाहता आपण ग्राहक आणि त्यांच्या किंमत निर्देशांक कडे पाहिले तर जुलै महिन्यामध्ये तब्बल 3.3 अंकांनी वाढ झाली होती. ती त्यामध्ये आता 139.7 अंकावर पोचल्याचा आपल्याला दिसत आहे..

अशा परिस्थितीमध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तब्बल 42 टक्के इतका महागाई भत्ता सध्या प्रदान केला जात असून यामध्ये ऑल इंडिया कंजूमर प्राईज इंडेक्स, यासोबतच कंजूमर फूड प्राइज इंडेक्स या ठिकाणी डेटा हा पूर्णपणे जाहीर केला जात आहे (DA Hike central govt employees). त्याप्रमाणे आता महागाई भत्ता हा तब्बल चार टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता दिसत आहे. म्हणजेच सध्या मिळणारा जो काही महागाई भत्ता आहे तो 42 टक्के असून चार टक्क्यांची वाढ झाल्यानंतर हा महागाई भत्ता थेट 46 टक्क्यांवर पोचणार आहे. अशी दाट शक्यता तज्ञ लोकांनी वर्तवली आहे. परंतु या संबंधित महत्वपूर्ण निर्णय हा केंद्रीय मंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर केला जाईल आणि तिथून पुढे हा नियम लागू होईल.

मोठी बातमी! महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळणार या शासकीय कर्मचाऱ्यांना; पहा संपूर्ण माहिती;

महागाई भत्ता व डी आर मधील वाढ व त्याचे स्पष्टीकरण;

केंद्र शासना अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्ता चा आणि डी आर चा विचार केला तर यामध्ये होणारी वाढ ही सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षाला होत असते आणि ती पण वर्षातून दोनदा म्हणजेच जुलै महिन्यामध्ये व जानेवारी महिन्यामध्ये ही वाढ होत असते. सध्या याविषयी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण उपलब्ध डेटावरून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दोन्ही भत्त्यांमध्ये तब्बल चार टक्के वाढवून दिले जातील (Central DA hike 2023). असे दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच 120 दिवसांमध्ये महागाई भत्ता थेट 50% पर्यंत पोहोचू शकतो अशी सुद्धा माहिती तज्ञ लोकांनी दिली.

ज्यावेळी सध्याचा महागाई भत्ता 46% पर्यंत पोहोचेल त्यावेळी बाकीचे सर्व भत्ते हे 25% ने वाढतील व राज्य शासनांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा याच पद्धतीने या निर्णयामुळे दिलासा मिळाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्य शासनांतर्गत शासकीय कर्मचारी व केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी नक्कीच ही महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी ठरणार आहे.

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *