Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ DA Arrears Calculation ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून 04 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्यातील कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता फरक मिळेल याबाबत गुणक सहाय्यने पाहणार आहोत .
वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर , ऑक्टोंबर या चार महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम ही माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीन अदा करण्यात येणार आहे .
चार महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम काढण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे आपल्या मुळ वेतनाला 4 ने गुणून 100 ने भागावे . म्हणजे एका महीन्याची डी.ए थकबाकी येईल तर आलेल्या एका महिन्याच्या थकबाकी रक्कमेला परत 04 ने गुणावे ( 04 महिन्यांची थकबाकी असल्याने ) . आलेले उत्तर हे चार महिन्याची डी.ए थकबाकी असणार आहे .
उदा – X कर्मचाऱ्याचे मुळ वेतन हे 25,000/- आहे . तर 25,000 X 4 / 100 = 1000 /- रुपये ही एका महिन्याची महागाई भत्ता थकबाकी रक्कम असेल . तर 1,000/- X 4 ( 04 महिन्यासाठी ) = 4,000/- रुपये ही रक्कम चार महिन्यांच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम असेल . म्हणजेच X कर्मचाऱ्यांस माहे नोव्हेंबर महिन्यांच्या वेतनासोबत 4,000/- रुपये महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळेल .
मूळ वेतन गुणले 4 भागुले 100 = ( XX) गुणुले 4 = एकूण 4 महिने महागाई भत्ता फरक थकबाकी रक्कम येईल .या सूत्राचा वापर करावा ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.