Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cyclone fengal rain Update] : देशामध्ये चक्रीवादळाचे पुन्हा एकदा थैमान दिसून येणार आहे , फेंगल या चक्रीवादळामुळे देशातील काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे .
सदर फेंगल या चक्रीवालाचा परिणाम देशातील तमिळनाडूसह दक्षिणेकडील राज्यामध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे . हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण – पश्चिम बंगालच्या खाडीवर सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने , सदरचे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
सदर चक्रीवादळाचा परिणाम देशातील तमिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर सर्वाधिक होण्याची शक्यता आहे . यामध्ये प्रामुख्याने कराईकल , महाबलीपुरम या भागात अधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
सदर फेंगल या चक्रीवादळाचा ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . सदर फेंगल चक्रीवादळ दिनांक 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू , पांडेचेरी, या ठिकाणी परिणाम करणार आहे . दरम्यानच्या कालावधीत या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
याशिवाय आंध्र प्रदेश किनारी भाग तसेच रायलसीमा प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून , सदर भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे . सदर चक्रीवादळाचा महाराष्ट्र राज्याला विशेष अशा प्रकारचा परिणाम जाणवणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे . तर किनारी भागामध्ये काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .