Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Crop Insurance News ] : केंद्र सरकारकडून खरीप पिक विमा योजनांमध्ये मोठा महत्वपुर्ण बदल करण्यात आला आहे , या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे . या बदलानुसार आता विमा कंपन्यांना पिकांच्या कोणत्याही टप्यावर पिकांचे नुकसान झाल्यास ते विमा कंपन्यांना आता 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे .
यापुर्वी विमा कंपन्यांकडून सन 2023-24 या वर्षातील खरीप हंगाम करीता उत्पादन खर्चानुसार तसेच पिकांची स्थिती वर आधारीत भरपाई दिली जात होती . तर पिकांची लागवड केल्यानंतर एका महिन्यांत नुकसान झाल्यास , सदर पिकांस आलेल्या खर्चाच्या 45 टक्के रक्कम भरपाई म्हणून दिली जात होती . केंद्र सरकारकडून विमा योजनांमध्ये केलेले महत्वपुर्ण बदल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पिकांचे कोणत्याही टप्यावर ( यांमध्ये लागवड , पिकांची वाढ , काढणी यांचा समावेश ) पिंकाचे नुकसार झाले असल्यास त्यास 100 टक्के भरपाई द्यावी लागणार आहे . सदर निर्णयाची अंमलबजावणी ही सन 2023-24 या खंरीप हंगामापासूनच करण्यात येणार आहेत . या निर्णयामुळे विमा कंपन्यांना यापुर्वी पिकांचे नुकसान झाल्याबाबत देखिल भरपाई द्यावी लागणार आहे .
सदर निर्णयास विमा कंपन्यांचा विरोध : सदर निर्णयानुसार विमा कंपन्यांवर आर्थिक बोजा वाढेल , तर अनेक कंपन्यांना आपल्या स्वत : च्या उत्पनातुन विमा रक्कम द्यावी लागू शकते . यामुळे विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पो ( विमा कंपनीने ) भारतीय कृषी खात्यात पत्र लिहून सदर निर्णयावर पुन्हा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे .