Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ crop insurance amount publish ] : पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यानुसार पिकाच्या नुकसान करीता विमा रक्कम कृषी विभाग मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे .

 पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत जिल्हांमधील सर्व तालुकानिहाय नुकसान झालेल्या पिकांसाठी विमा कवच व विमा हप्ता कृषी विभाग मार्फत जाहीर केला गेला आहे . सदरचे विमा संरक्षण शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये काढता आले आहेत . कृषी विभागांकडून जाहीर केलेल्या विमा संरक्षण कवच मध्ये भाताला सर्वाधिक प्रति हेक्टरी 51,760/- रुपये इतका विमा संरक्षण मिळाला आहे .

 01 रुपयांमध्ये पीक विमा संरक्षणाचा लाभ घेण्याकरीता खरीब हंगामामध्ये सर्वसामावेशक पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली गेली असून , शेतकऱ्यांनी दिनांक 15 जुलै पर्यंत याबाबत नोंदणी करुन योजनेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन कृषी विभागांकडून करण्यात आले आहेत .

यांमध्ये पिकांची नैसर्गिक आपत्ती , कीड तसेच रोगासारख्या प्रतिकुल परिस्थीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानी करीता शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते . या विमा संरक्षण योजना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पिकनिहाय व तालुकानिहाय विमा रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे .

पिकांचे नावेतालुकाविमा रक्कम (प्रति हेक्टरी)विमा हप्ता
भातहवेली ,मावळ , हवेली , वेल्हा , जुन्नर , खेड , आंबेगाव , पुरंदर51,760/-1552.80/-
बाजरीहवेली , खेड , आंबेगाव , शिरुर , बारामती , इंदापुर , दौंड , पुरंदर24,000/-2640/-
ज्वारीआंबेगार , खेड , भोर , हवेली27,000/-4860/-
नाचणीमुळशी , आंबेगाव , वेल्हा , खेड, भोर20,000/-800/-
तुरशिरुर , बारामती , इंदापुर35,000/-7350/-
मूगशिरुर20,000/-5000/-
उडीदशिरुर20,000/-5000/-
भुईमुगशिरुर , आंबेगाव , मावळ , वेल्हा , जुन्नर , खेड , मुळशी , हवेली40,000/-3200/-
सोयाबीनआंबेगाव , मावळ , बारामती , खेड , जुन्नर , इंदापुर49,000/-3920/-
कांदाबारामती , इंदापुर , दौंड , पुरंदर80,000/-6400/-

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *