Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cow & buffalo milk business with government subsidy ] : आपणास जर शेतीतून हवा असा उत्पन्न मिळत नसल्यास , शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करावा जेणेकरून आपणास पूरक उत्पन्नाची हमी मिळत राहील . यामध्ये सरकारी योजनेतून गाय व म्हशी 75 टक्के अनुदानातून लाभ कसा घ्यावा , या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये घेवूयात..
दुधाळ जनावर वाटप योजना अंतर्गत 75% पर्यंत मिळते अनुदान ; आपणास जर दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असल्यास , राज्य शासनाकडून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग मार्फत दुधाळ जनावर वाटप या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान तर सर्वसाधारण गटाला 50 टक्के अनुदानातून लाभ दिले जाते .
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास दोन दुधाळ जनावरांचा एक गट वाटप केला जातो , यामध्ये गाईच्या गटाकरिता 75 टक्के अनुदान म्हणजेच एक लाख 17 हजार 668 रुपये अनुदान दिले जाते . तर म्हशीच्या एका गटाकरिता एक लाख 34 हजार इतके अनुदान दिले जाते . याकरिता शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक असेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष या योजनेच्या माध्यमातून 75 टक्के अनुदानातून लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक असणार आहे , त्याचबरोबर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल . याशिवाय सर्वसाधारण गटामध्ये अल्पभूधारक शेतकरी त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्राधान्य दिले जाईल .
आवेदन कसे सादर कराल : दुधाळ जनावर वाटप योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने महाबीएमएस या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करू शकता . अथवा आपल्या जिल्ह्याच्या पशुधन विकास अधिकारी , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांच्याशी संपर्क साधून या योजनेबाबत सविस्तर माहिती घेवून लाभ घेवू शकता..