Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ court results about father property ] : हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 नुसार , वडिलांचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी सदर वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार राहणार नसल्याचे एका खटल्यादरम्यान कोर्टाने निर्णय दिला आहे .
यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , सदर कायदा 1956 पासून लागू करण्यात येत असून यापूर्वीच्या प्रकरणी सदर नियम लागू होत नाहीत . यामध्ये सन 2007 पासून प्रलंबित असणाऱ्या एका प्रकरणात निकाल देताना मुंबई खंडपीठाच्या न्यायमूर्ती एएस चांदुरकर व न्यायमूर्ती जितेंद्र जैन निकाल देताना स्पष्ट केले की , सदर प्रकरणी व्यक्तीचा मृत्यू हा सन 1956 पूर्वी झाला असल्याने …
सदर व्यक्तीच्या मुलींना हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 नुसार वडिलांच्या संपत्तीत मुलींस अधिकार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे . कारण त्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार संपत्तीच्या वाटपामध्ये मुलींना वारस म्हणून मान्यता देण्यात आलेली नव्हती , यामुळे त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार संपत्तीचे वाटप केले जाईल असे नमूद करण्यात आले आहेत .
नेमकी प्रकरण काय ? : यामध्ये मुंबई येथील यशवंतराव या व्यक्तीच्या पहिल्या पत्नी लक्ष्मीबाई यांचे निधन झाल्यानंतर , यशवंतराव यांनी भिकुबाई यांच्याशी पुनर्विवाह केला , ज्यांच्यापासून त्यांना चंपाबाई ही मुलगी जन्मास आली . काही वर्षानंतर , त्याची पहिली पत्नीपासून झालेली मुलगी राधाबाई हिने तिच्या वडिलांच्या म्हणजेच यशवंतराव यांच्या अर्ध्या संपत्तीवर दावा केला .
यामध्ये राधाबाई याने हिंदू उत्तराधिकारी नियम 1956 व 2005 नुसार , वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळावा , अशी याचिका कोर्टात दाखल केली होती . परंतु तिचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. कारण कोर्टाने नमूद केले की , हिंदू महिला संपत्ती हक्क नियम 1937 अंतर्गत यशवंतराव यांची संपत्ती त्यांची पत्नी फक्त भिकुबाई यांनाच मिळेल , तर हिंदू उत्तर अधिकारी कायद्यानुसार 1956 नुसार त्यांची पत्नीच वारस बनली होती .
म्हणजेच सदर प्रकरण हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 पूर्वी असल्याने , सदर प्रकरणी याचिका कर्ती मुलगी राधाबाई यास वारस म्हणून घोषित न केल्याने , त्यांना संपत्तीमधील कोणताही अधिकार मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे .