Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Court result about unfit employee ] : कर्मचारी शासन सेवेत असताना अपघातामुळे व इतर वैद्यकीय कारणास्तव अनफिट झाला असेल , अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यांस शासन सेवेतुन काढून टाकता येत नाहीत , तर त्यांना निवृत्ती पर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक व इतर लाभ देणे बंधनकारक ठरते अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय मुंबई मॅट कडून 09 जुन रोजी देण्यात आला आहे .
याचिका कर्ते चनबसय्या संगमठ हे सोलापुरचे रहिवाशी असून , ते पोलिसा शिपाई पदावर कार्यरत होते , ते खाजगी कामानिमित्त रेजेवर असताना दिनांक 28.10.2022 रोजी त्यांचा अपघात झाला त्यांत त्यांची पत्नी व ते गंभीर जखमी झाले , यामुळे त्यांना काम करता येणं शक्य नसल्याने , त्यांची नेमणूक ही फौजदार चावडी पोलिस ठाण्यांत नेमणूक करण्यात आली , कालांतरणाने त्यांना पक्षाघाताचा झटका आला , त्यामुळे त्यांना मेडिकल बोर्डापुढे पाठविण्यात आले .
मेडिकल बोर्डाने त्यांना अनफिट घोषित करण्यात आल्याने , सोलापुर पोलिस आयुक्तांनी त्यांना नोकरीतुन काढून टाकले , यावेळी त्यांना पेन्शन देण्याची तयारी दर्शविण्यात आली , परंतु यावेळी संगमठ यांनी मॅट मध्ये धाव घेतली . मॅटमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील कुणालसिंग प्रकरणांचा हवाला दिला .
यांमध्ये मुंबई मॅटने संगमठ यांना दिला देत दिनांक 18.11.2022 चा इनव्हॅलिड पेन्शनचा आदेश रद्द करत पेन्शन नियम 20( 4 ) नुसार शासकीय कर्मचारी निवृत्तीपर्यंत नोकरीत आहे असे ग्राह्य धरुन 24 तासात नेमणुकीवर असतात , असे समजावेत , असे स्पष्ट करीत त्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक लाभ देण्याचे देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत .
यावेळी संगमठ यांची बाजु मुंबई मॅट मध्ये ॲड.भुषण बांदिवडेकर व ॲड. गौरव बांदिवडेकर यांनी मांडली व अखेर संगमठ यांना न्याय मिळवून दिला .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.