न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात नविन शासन परिपत्रक निर्गमित !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने कार्यवाही करणे संदर्भात राज्याचे उपसचिव यांच्याकडून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत.

सदर परिपत्रकानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेत दाखल झालेल्या रिट याचिकांमध्ये मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे अनुपालन न केल्याचे निदर्शनास आलेले आहेत . या अनुषंगाने आता राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहेत कि , शालेय शिक्षण विभागाचा दिनांक 21.06.2023 रोजीच्या संदर्भाधीन शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागास निर्देश दिलेले आहेत .

हे पण वाचा : Good News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये तब्बल तीन वर्षानंतर दुपटीने वाढ होणार , पहा सविस्तर …

या कारणमुळे राज्यातील प्रा.शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीचे सुधारित धोरण अद्याप निर्गमित करण्यात आले नसल्याने , सन 2023-24 ची ऑनलाईन बदलीची प्रक्रिया (Transfer Process ) ही सुरु करता आली नाही , त्यामुळे मा. न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील विविध रिट याचिकांप्रकरणी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 07.04.2021 तसेच प्रचलित धोरणानुसार , ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन करणेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : OPS News :  जुनी पेन्शनच्या मागणीकरीता ,राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी जाणार , पुन्हा एकदा राज्यव्यापी संपावर ..

तसेच मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन करावेत , व कोणत्याही परिस्थितीत मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होणार नाही , याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत .या संदर्भात मंत्रालयीन सेवा -उपसचिव यांच्या कडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment