मराठी पेपर, संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी राज्य शासनाने दिली आहे , ती म्हणजे दिनांक 17 जुलै 2023 रोजी विधिमंडळामध्ये कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी संदर्भात संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता , सदर कंत्राटी /रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करणे संदर्भात महत्वपूर्ण सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे .
राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत गत दहा – पंधरा वर्षापासून आरोग्य सेविका ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत असणारे कर्मचारी हे कंत्राटी तत्त्वावर काम करीत असून , त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधीची मा. आरोग्य मंत्री यांचे समवेत बैठक होऊनही अद्याप कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करण्यात आला होता .
या प्रकरणावर राज्य शासनाकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे राज्य शासनाने नमूद केली आहे . त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार सदर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून , त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे राज्य शासनाने यावेळी नमूद केले आहेत.
यामुळे राज्यातील इतर विभागातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणे संदर्भात राज्य शासनाकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याची ग्वाही राज्य शासनाकडून देण्यात आले आहे .या संदर्भात विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेली, सविस्तर प्रश्न – उत्तर पुढीलप्रमाणे पाहुयात..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !