10 वर्षे पुर्ण झालेल्या कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत सामावून घेण्याचा कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय ; दि.13.03.2024

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Contractual / Daily Wages Employee permanent , Cabinet Nirnay ] : राज्य शासन सेवामध्ये कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने 10 वर्षे पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत सामावुन घेण्याचा मोठा निर्णय दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला .

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपेकी ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षे पुर्ण झालेल आहेत , अशा कंत्राटी तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील मंजूर पदांवर शासन सेवेत सामावून घेणेबाबत काल दिनांक 13.03.2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

ज्यांची सेवा 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांकरीता वयाची अट शिथिल करुन नियमित मंजूर पदांवर सामावून घेण्यासाठी सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करुन मंजुर पदांच्या 30 टक्के प्रमाणात समायोजन करण्यात येणार आहेत , तर उर्वरित 70 टक्के पदे हे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत . तर सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन स्तर निश्चित करताना मागील महिन्यात प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित ( 7 व्या वेतन आयोगांमध्ये ) श्रेणीतील पुढील टप्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आले आहेत .

सदर समायोजन करत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांकरीता आवश्यक असणारे शैक्षणिक अर्हता बाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले मार्गदर्शक तत्वे तसेच सुचना यांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणर आहेत , या निर्णयामुळे हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहेत .

आयटीआय मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवा : राज्य शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये कार्यरत असणारे कंत्राटी शिल्प निदेशकांच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग मध्ये सामावून घेण्यास मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . यांमध्ये आयटीआय मधील 279 कंत्राटी शिल्प निदेशकांना शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहेत . सदर पदांना शासन सेवेत सामावून घेतल्यानंतर वेतन व इतर भत्यांकरीता येणारा 16.09 कोटी इतका प्रति वर्ष खर्चास सदर मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment