Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [contractual / Daily Wages Employee Good News ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावुन घेण्यात येणार असल्याची मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अनेक कर्मचारी कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कार्यरत आहेत , अशा कंत्राटी / रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरीता राज्य शासनांकडून सर्व विभागांकडून माहिती मागविण्यात आली आहे . मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार कंत्राटी / रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील सेवेचा / कामाचा विचार करुन त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
10 वर्षाची असणार अट : कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे , 10 वर्षे पुर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना / ज्या दिवशी 10 वर्षे पुर्ण होतात त्या दिवसांपासून शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहेत . राज्य शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत 10 वर्षे कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
इतर विभागातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती गोठा करण्यास सुरुवात : 10 वर्षे पुर्ण करणाऱ्या राज्यातील सर्वच विभागातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांची माहिती राज्य शासनांकडून मागविण्यात येत आहेत . अशा 10 वर्षे पुर्ण करणाऱ्या कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .