Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ congratulation employee joining letter ] : आदिवासी विकास विभाग अंतर्गत कंत्राटी तत्वावर कला /क्रीडा / संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देणे संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , महत्वपूर्ण निर्देश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले होते .

सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने , आदिवासी विकास विभाग अंतर्गत कला /क्रीडा /संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत देण्यात आलेले आहेत . याकरिता जे कर्मचारी जुने होते , अशाच कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आलेले  आहेत .

याकरिता जे कर्मचारी जुने होते त्यांना पुनर्नियुक्ती करिता संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे आवेदन सादर केल्यानंतर , सदर कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल तपासून पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे . अशा कर्मचाऱ्यांची यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही शैक्षणिक वर्ष 2024-25 अखेरपर्यंत करण्यात आली असून , सदर कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्षाकरिता त्यांच्या कामकाजा नुसार व आवश्यकतेनुसार पुनर्नियुक्ती दिली जावू शकते असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे .

तर सदर कर्मचाऱ्यांना भविष्यात नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे कोणतेही लाभ अनुज्ञ होणार नसल्याचे , आदेशात उल्लेख करण्यात आलेला आहे . यामध्ये 252 कलाशिक्षक , 340 क्रीडा शिक्षक 344 , संगणक शिक्षक असे एकूण 836 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *