Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Complaint Against evm hacker ] : ईव्हीएम हॅक केल्याच्या दावेदारावर अखेर निवडणुक आयोगा कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर प्रकरण नेमका काय आहे ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाविकास आघाडी पक्षांकडून प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत . यातच एका व्यक्तीने ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करत आहे . सदर दावा खोटा असुन , ईव्हीएम हॅक होवू शकत नसल्याचे आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .
सदर हॅकर्सचे नाव हे सय्यद सुजा असे आहे , सदर व्यक्तीचा संबंध हा ईव्हीएम बनविणाऱ्या कंपनीशी असल्याची माहिती समोर येत असल्याने , आता संशय वाढत असल्याचे , विरोधांकडून बोलले जात आहेत . सदरच्या व्यक्तीने सन 2009 ते 2014 या काळांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ईव्हीएम बनविणाऱ्या सार्वजनिक कंपनीमध्ये काम केल्याने , सदर संशय काहीसा सत्यता पडताळणी केली जावी अशी विरोधकांची मागणी होत आहे .
ईव्हीएम हॅक होत असल्याचा व्हिडीओ हॅकर्स मार्फत जारी : हॅकर्स सोबत Video कॉलिंग द्वारे बोलताना संवादात 105 पैकी 63 उमेदवार जिंकवुन देण्याची माहिती घेतली जात आहे . तसेच या करीता VVPAD मशीन क्रमांक आवश्यक असल्याचे स्पष्टीरण होत आहे .
तर राज्यातील 288 पैकी 281 मतदार संघातील ईव्हीएमचा ॲक्सेस असल्याचा दावा यांमध्ये केला आहे . जे कि , ईव्हीएम बंद असतानाही देखिल त्यावर बदल होते , तर व्हीव्हीपॅट मशीनला देखिल हॅक करीत असल्याचे स्पष्टीकरण सदर व्हिडीओ मध्ये स्पष्ट केले आहेत .
आयोगाकडून हॅकर विरोधात गुन्हा दाखल : सदर हॅकर्सचा दावा हा खोटा , बिनबुडाचा तसेच निराधार असल्याचे , आयोगाकडून स्पष्टीकरण देत , सदर हॅकर्स विरोधात आयोगांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !