Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ CM vayoshri Yojana GR ] : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3,000/- रुपये आर्थिक सहाय्यक देण्याकरीता राज्य शासनांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याबाबत , दिनांक 06.02.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोवृद्ध कालावधीमध्ये येणारा दैनिक खर्च तसेच इतर वैद्यकीय खर्चाकरीता आवश्यक साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी सदर मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत रुपये 3,000/- इतके आर्थिक सहाय्य राज्य शासनांकडून वरील नमुद शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .
या योजनासाठी पात्रता : या योजना दिनांक 31.12.2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण झालेले राज्यातील ज्येष्ठ नागरिक व त्या पेक्षा अधिक वय असणारे नागरिक या योजना अंतर्गत लाभ घेवू शकतील . सदर लाभ घेण्याकरीता लाभार्थी हा जिल्हा प्राधिकाणाकडून मिळालेले प्रमाणपत्र अथवा बीपीएल रेशन कार्ड , इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत मिळालेले वद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो ..
तसेच या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे कुटंबियाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असेल , त्याबाबत स्वयघोषणापत्र सादर करणे आवश्यक असेल . सदर योजना अंतर्गत रुपये 3,000/- ऐवढी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येईल . .
योजनेचे स्वरुप : या योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता / + दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे यांमध्ये चष्मा , श्रवणयंत्र , कमोड खुर्ची , फोल्डिंग वॉकर , नि-ब्रेस , लंबर बेल्ट , सर्वाइकल कॉलर इ. साधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्यक करण्यात येते .
आवश्यक असणारे कागदपत्रे : या योजनांसाठी आधारकार्ड / मतदान कार्ड , बँक पासबुकची झेरॉक्स , पासपोर्ट फोटो , स्वयं – घोषणापत्र , तसेच शासनाने ओळख पत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे आवश्यक असणार आहेत .
या योजना संदर्भात अधिक माहितीसाठी शासन निर्णय पाहण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावेत .