Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cm tirthdarshan yojana ] : राज्यांमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे , याबाबत अधिकृत्त राज्य शासनांकडून घेण्यात आलेला असून , याबाबतची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
योजनांच्या माध्यमातुन 10 हजार लोकांना तीर्थ दर्शन : राज्यातील ज्येष्ठ नागरिक यांना तीर्थ दर्शन करता यावेत , याकरीता विधानसभेत आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती , यावर राज्य शासनांकडून असा निर्णय घेण्यात आला कि , ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ यात्रा परवडणारी नाही , अशांना दर्शन घेता यावे , याकरीता सदर तीर्थदर्शन योजनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
या योजनेचे नाव मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना असे ठेवण्यात आले आहेत , याकरीता राज्य शासनांकडून लवकरच अधिकृत्त धोरणे ठरविले जाणार आहेत , या योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सर्व हिंदु , ईस्लाम , जैन , खिश्चन , ईसाई अशा सर्व धर्मीय लोकांसाठी ही तीर्थ दर्शन यात्रा सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत .
या योजना अंतर्गत किती लोकांना तीर्थदर्शनास पाठवू शकतो , याबाबत नियमावली ठरविण्यात येणार असून , यांमध्ये बाय रोटेशनप्रमाणे तीर्थदर्शन योजना सुरु असेल असे सांगण्यात आले आहेत . ही योजना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठीच लागु असणार आहे .
दिंडी वारीला अनुदान : राज्यात संताची भुमी असणाऱ्या पांडुरंगाची वारी सुरु आहे , अशा प्रत्येक वायी दिंडीला राज्य शासनांकडून प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .