Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ CM Meeting About State Employee OPS ] : जुनी पेन्शनबाबत काल दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी व मुख्य सचिव , प्रधान सचिव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली .या बैठकीमध्ये नेमके काय घडले ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

बुधवार दिनांक 13 डिसेंबर रोजी जुन्या पेन्शन योजनेबाबत , राज्य शासकीय मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनेसमवेत मंत्रीमंडळ कक्ष विधान भवन प्रांगण नागपुर येथे बैठक संपन्न झाली . या बैठकीस महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे श्री.कुलथे तसेच प्रतिनिधी , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे श्री.विश्वास काटकर व प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे श्री.संभाजीराव थोरात व प्रतिनिधी उपस्थित होते .

सदर बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले कि , कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही . तर आम्ही लवकरच निर्णय घेवू ,तसेच यावेळी नमुद करण्यात आले कि , तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले कि , कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होणार नाही याची काळजी राज्य शासनांकडून घेण्यात येईल , मागच्या संपावेळी माझे हेच शब्द होते , यावेळीही तेच शब्द आहेत . त्यावेळी सहकार्य केले यावेळीही संपाची हाक न देता सहकार्य करण्याची विनंती केली .

यावेळी कर्मचारी संघटनेचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाजु मांडताना सांगितले कि , जुनी पेन्शन व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन योजना लागु करणेबाबतच्या समितीचा अहवाल अधिवेशनांमध्ये सादर करण्यात यावा , व तात्काळ निर्णय घेण्यात यावा . यावर राज्य शासनांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही .

संपावर ठाम : सदर बैठकीमध्ये जुनी पेन्शन बाबत एक तासभर चर्चा करण्यात आली परंतु सदरची चर्चा व्यर्थ गेली , कारण पेन्शन बाबत कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय / आश्वासने न दिल्याने कर्मचारी संघटनांकडून  आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *