Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cm ladaki bahin yojana scheme ] : मध्य प्रदेश राज्य शासनांकडून महिलांना दरमहा 1500/- रुपये देण्याची योजना आहे , त्याच धर्तीवर राज्य शासनांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनास सुरुवात होत आहे . या योजना अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1200/- रुपये ते 1500/- रुपयांचा लाभ मिळणार आहे .
राज्यांत लोकसभा निवडणूकांमध्ये महायुती सरकारच्या पराभवानंतर राज्यातील जनतेला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर खुश करण्यासाठी नविन योजना सुरु करण्यात येत आहेत . याकरीता राज्य शासनांकडून सविस्तर नियोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहेत . सदरची योजना ही मध्य प्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर लागु करण्यात येत आहेत .
राज्यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गरीब महिलांना दर महिन्याला रुपये 1200/- ते 1500/- रुपये दिले जाणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात आली आहे . यामुळे राज्य शासनांच्या तिजोरीवर तब्बल 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचा अंदाज मंत्रालयीन सुत्रांनी सांगितले आहेत . सदरची योजना ही आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी तयारी सुरु असल्याचे बालले जात आहेत .
या योजनांनुसार राज्यातील गरीब / वयोवृद्ध महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने योजनांची सुरुवात करण्यात येणार आहेत , तसेच या योजना अंतर्गत पहिल्या टप्यांमध्ये DRD ( दारिद्य रेषा ) खालील 90 ते 95 लाख महिलांना दर महिन्याला 1200/- रुपये ते 1500/- रुपये दिले जाणार आहेत . यांमध्ये वय वर्षे 21 ते 60 वयोगटातील महिलांना तसेच विधवा , घटस्फोटित , परितक्त्या महिलांना प्रथम प्राधान्यांने सदरचा लाभ दिला जाणार आहे .
मध्य प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मागील वर्षीपासुन मुख्यमंत्री लाडकी बहना ही योजनाची सुरुवात केली होती , या योजनांमुळे मध्य प्रदेशांमध्ये लोकसभेत 29 जागांपैकी 29 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडुन आल्या असल्याने ,विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यांमध्ये देखिल अशीच योजना लागु करण्याची तयारी शिंदे सरकारकडून केली जात आहे .